मराठा आरक्षणाचे श्रेय लाटणाऱ्या शिवसेनेला ट्विटरवर म्हटले गेले 'फशिवसेना'

Foto

मुंबई - #मराठा_विरोधी_शिवसेना असा ट्रेंड सध्या ट्विटरवर मराठा समाजातील काही तरुणांकडून सुरू आहे. शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कशा प्रकारे मराठा आरक्षणाचा विरोध केला होता याचे काही दाखले या तरुणांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहेत. 

शिवसेनेने मराठा आरक्षणाच्या वेळी पुढाकार तरी घेतलाय का किंवा यांच्या नेत्यांवर एकतरी मराठा रक्षणासबंधी केस आहे का ? शिवसेना म्हणते की उद्धव ठाकरे यांच्या दूरदृष्टीने मराठा समाजाला आरक्षण मिळाले. तर शिवसेनेच्या नेत्यांनी ट्विटरवर जाऊन पाहावे, मग तुमच्या लक्षात येईल की किती ट्विट्स #मराठा_विरोधी_शिवसेना या ट्रेंडच्या माध्यमातून मराठा तरुणांनी केले आहेत. मराठा मोर्चेकऱ्यांचा चपलेने मार खाणारे शिवसेनेचेच नेते आहेत किंवा मग आरक्षणासाठी शिवसेनेने सत्ता सोडण्याची धमकी कधी दिलेली आठवत नाही. आम्ही विसरलो नाहीत, औरंगाबाद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा तरुणांना मोर्च्यात मारहाण केली होती. शिवसेना नेहमी सत्तेला लाथ मारण्याची धमकी देते आणि कमळी पुढे गोंडा घोळते...! मराठा आंदोलकांना विरोध करत आंदोलकांना लाथा मारते. मराठा समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल संजय राऊत यांचाही या मराठा तरुणांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यासाठी नाक्या नाक्यावर बॅनर लावून संजय राऊत यांचा निषेध देखील करण्यात आला होता. आणि मराठा आरक्षणाचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना कालपासून धडपड करत आहे. मराठा समाजातील तरुणांना लाथा बुक्याने मारहाण करणाऱ्या अंबादास दानवेला पाठीशी घालणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मराठा समाज कधी ही माफ करणार नाही. आशा संतप्त प्रतिक्रिया आता सोशियल मीडियावर दिसून येत आहेत.

काय आहेत मराठा तरुणांच्या प्रतिक्रिया ?


१) सेनेने मराठा आरक्षणासाठी एकही आंदोलन केले नाही
२) मराठ्यांच्या शांततेत निघालेल्या मोर्चाला मुका मोर्चा असे सामना या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने तमाम स्त्रियांचा अपमान केला. 
३) सेनेने शिवस्मारकासाठी कधीही आंदोलने केली नाहीत पण बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मंजूर करून घेतले.
४) मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्यास शिवसेनेने विरोध करून मराठा दलित यांच्यात दंगली घडवल्या
५) शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून सत्तेत आलेल्या शिवसेनेने शिवरायांचा अपमान करणाऱ्या लेन आणि पुरंदरेंना मदत केली. पुरंदरेला पाठबळ देऊन सेनेने जिजाऊ शिवरायांची बदनामी केली.